नारळाचे तेल- एक अमृततुल्य आरोग्यदायी खाद्य (A Healthy Food)

नारळाचे तेल (Coconut Oil)- एक अमृततुल्य आरोग्यदायी खाद्य

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभकार्याची सुरुवात नारळाच्या अर्पणाने केली जाते. जसे लग्न-प्रसंगी, गृहप्रवेश करताना, उत्सव, नवीन वाहन वापरणे असे कितीतरी शुभकार्य नाराळाविना पुर्ण होऊ शकतच नाही. म्हणजेच काय तर सर्व धार्मिक कार्याची सुरुवात हि नारळाने च केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये नारळाला सुदैवी (Good Luck) आणि तसेच समृद्धी (Prosperity) चे प्रतीक मानल्या जाते. नारळाला अमृत/श्रीफळ देखील म्हटल्या गेले आहे. तसेच यात अनेक अलौकीक औषधीय गुण आहे.  नारळाच्या झाडाला “कल्पवृक्ष” देखील म्हणतात. त्यामागे अनेक आयुर्वेदिक आणि शास्त्रीय कारणे देखील दडलेली आहेत.

नारळाच्या तेलात मनोरंजक उपचारात्मक मुल्ये (Therapeutic Value) आहेत. ह्या तेलाचा वापर स्वयंपाक करण्याकरिता तसेच सौंदर्य खुलवण्यासाठी होतो म्हणजेच काय तर आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीही करिता उपयोगी असे हे नारळाचे तेल. जसे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करणे (Wrinkles), मॉइश्चरायझर (Moisturizer) त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे, स्ट्रेच मार्क कमी करणे (Stretch Mark), ओठांचा कोरडेपणा कमी करणे, केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी, कवळ-गंडुष (Oil Pulling) असे बरेच काही सौंदर्य-वर्धक उपयोगी हे नारळाचे तेल.

कोरड्या त्वचे करिता (Dry Skin) नारळाचे तेल ते उत्कृष्ठ Moisturizer असल्याचे आढळले आहे. हि एक नैसर्गिक चरबी (Natural Fats) असल्यामुळे त्वचेच्या आजारावर उत्तम उपाय आहे. प्रा. डॉ हेगडे यांच्या मते नारळाचे तेल लावल्याने त्वचेच्या संसर्गाचे (Skin-Infection) गंभीर स्वरूप देखील पूर्णपणे बरे होऊ शकतात. केस निरोगी आणि स्वच्छ राहण्याकरिता नारळाच्या तेलाला केसांच्या मुळाशी लावायला सांगतात.

प्रख्यात डॉक्टर आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त  डॉ बी. एम हेगडे म्हणतात नारळाचे तेल हे त्वचेच्या आजारावर तसेच अल्झायमर (Alzimer ) रोगावर उपचार करण्यासाठी सर्वात उत्तम स्त्रोत आहे. नारळाचे तेल आणि आईच्या दुधात सोडियम-मोनोलेरेट (Sodium-Monolaurate) आहे, जे मोनोलेरिक ऍसिड (Monolauric Acid) आहे आणि हे मानवी रोगप्रतिकारक शक्तीचा आधार आहे (Human Immune System). नारळाचे तेल आणि आईचे दुध फक्त दोनच गोष्टी बाळाच्या तोंडात पचतात. तोंडात पचन झाल्यामुळे आणि किटोन्स (Ketones) मध्ये रूपांतर होत असल्यामुळे अल्झायमर (Alzimer) रोगावर उपचार करण्यासाठी नारळाचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.

आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे कि नारळाचे तेल वजन नियंत्रणात मदत करू शकते. कमी कॅलरीयुक्त (Low Calorie Fats) असल्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत होते.  नारळाचे तेल चरबी ज्वलन (Fat-Burning) वाढवण्यासाठी तसेच शरिराला आणि मेंदूला ऊर्जा (Energy) प्रदान करते असे आढळून आले. तसेच हे तेल चयापचयाला उत्तेजित करते (Stimulates Metabolism).

नारळाच्या तेलातील लॉरीक ऍसिड (Lauric Acid) ; मोनोलॉउरीन (Monolaurin) यांच्यातील अंतर्भूत अँटिबायटिक (Antibiotic) गुणधर्मामुळे ते मानवी शरीरात व्हायरस (Virus), बॅक्टेरिया (Bacteria), बुरशी ह्यासारख्या सुक्ष्म जंतूंचा नाश करू शकतात आणि ह्याच कारणाने विविध प्रकारच्या संक्रमणापासुन संरक्षक (Protective Agent) करू शकतात. नारळाच्या तेलाच्या नियमित सेवनाने रक्त चरबी नियंत्रित  होते. तसेच LDL ; Triglycerides कमी होऊन HDL Colesterol कोलेस्ट्राल अंश वाढतो. मधुमेहामध्ये (Diabeties) रक्तातील चरबीची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

नारळाच्या तेलाला कार्यशील खाद्य (Functional Food ) म्हणून वर्गीकृत केलं गेलं आहे. मुलभूत पोषक आहार (Basic Nutrients Food) आणि त्याहून अधिक आरोग्य लाभ (Health Benefits ) प्रदान करणारे अन्न असे परिभाषित केले गेले आहे.

नारळाचे तेल हे कोणत्याही स्वरूपात वापरणे चांगले आहे परंतु उपचारासाठी Virgin Coconut Oil हे सर्वोत्कृष्ट समजल्या जाते. हे तेल कोणत्याही रासायनिक प्रक्रिया न करता काढले जाते.

नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे, तसेच बायोडिग्रेडेबल (Biodegradable) आहे. अश्या या कल्पवृक्ष नारळाचे तेल हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरू या आणि समृध्द जीवन बनवु या.

चला तर मग… आपल्या भारतीय पारंपारिक आणि नैसर्गिक पध्दतीने तयार केलेल्या लाकडी घाणीचे नारळाचे तेल वापरू या. आपल्या परिवाराला आणि येणाऱ्या पिढीला सुदृढ बनऊ या .

Ref. :i)https://www.coconutboard.in/images/Articles/English-Article-Hegde.pdf

ii)https://www.moneylife.in/article/prof-dr-hegde-says-all-izz-well-with-coconut-oil/23591.html

iii)Lipid/Ez-Jan-Jun-2019.pdf, Blends of Coconut Oil by Dr. Surjit Kumar Saha

 

Buy Cold Pressed oil from : https://stavyas.com/shop/

खाद्य तेल आणि भारतीय पारंपारिक दृष्टिकोण blog : https://stavyas.com/edible-oil-and-the-traditional-indian-approach/