Healthy Cold Pressed Virgin Pure Oil

खाद्य तेल आपल्या दैनंदिन आहारामध्ये खूपच महत्त्वाचे आहे. लोक ह्याबाबतीत  फारसे गंभीर नाहीत. आपल्या परिवारा करिता कोणते तेल वापरावे हे जाणुन घेण्यास फारच उदासीन आहेत. हा निष्काळजीपणा आपल्या परिवाराकरिता गंभीर आजार ओढवू शकतॊ. कोणत्या खाद्यतेलाचा वापर करावा, ह्या बाबतीत बऱ्याच लोकांचे दुमत आहे. टीव्ही वर येणाऱ्या जाहिरातीमुळे आपण अजूनच संभ्रमात पडतो.  मोठं-मोठ्या कंपनी जाहिराती मार्फत त्यांचे तेल आरोग्यास किती आणि कसे चांगले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. खाण्याकरता कोणते तेल वापरायला हवे? कोणते तेल आपल्या प्रियजना करीत योग्य आहे?

त्याचा आयुर्वेदिक दृष्टिकोण काय आहे?. हे आपण  थोडं जरा समजण्याचा प्रयत्न करूया.

 

आपल्याला माहीतच आहे कि आयुर्वेदाला संपूर्ण जगात फार जुनी आणि अस्सल वैदकीय चिकित्सा समजली जाते. हे विज्ञान नुसते रोगनिवारक (Curative) नसून प्रतिबंधात्मक (Preventive) देखिल आहे. आयुर्वेदानुसार तिळाचे  तेल हे सर्वोत्कृष्ट मानल्या गेले आहे.  तिळापासूनच तेल हा शब्द बनलेला आहे असे म्हणतात. हे तेल वात आणि कफ शमन करणारे आहे. आयुर्वेदां मध्ये जे Medicated Oil बनवल्या जातात त्या करिता Base Oil म्हणुन तिळाच्याच तेलाचा वापर केल्या जातो. तसे पाहिले तर तिळाचे तेल आपल्या आरोग्या करिता खूप गुणकारी आहे पण रोजच्या वापरण्यात खाण्याकरिता ह्या तेलाचा वापर करत नाही (Practically). तिळ तेल हे उष्ण आहे. मग कोणते तेल वापरायचे आपल्या परिवाराकरिता?

 

देशसात्म्य : देश म्हणजे प्रदेश (Region), सात्म्य म्हणजे अनुकूल (Suitability)

आपण ज्याठिकाणी राहतो त्याठिकाणी उगवणारे फळे, भाज्या, कडधान्यें आणि तेल-बियाणे हे आपल्याकरिता सर्वोत्कृष्ट आहे. सात्म्य शब्द हा मुळ संस्कृत भाषेत आहे आणि आयुर्वेदामध्ये आरोग्याकरिता फार महत्वाचा मानला जातो. ह्या संकल्पनेत आहार आणि औषधी एका व्यक्तिला जर योग्य असेल तर दुसऱ्याला योग्य असणारच असे नाही. आहार हा प्रत्येक प्रदेशानुसार बदलत जातो.  

उत्तर-प्रदेशीय (Northern Region) भाग, तिथे सरसो/मोहरी/राई (Mustard) च्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात होतो. सरसो चे तेल गरम आहे. उत्तरप्रदेशीय भागात थंडी जास्त असल्यामुळे  सरसो तेल उत्तर आणि  उत्तर-पुर्व (North-East) भागात योग्य समजले जाते.

दक्षिण प्रदेशीय (Southern Region) भाग उष्ण असल्यामुळे तिथे नारळा चे तेल योग्य समजले जाते. नारळ हे थंड प्रकृती मधे येते.

जे मध्य-भारतात राहतात जसे-महाराष्ट्र, गुजरात, मध्य-प्रदेश ह्या करिता शेंगदाणे (Groundnut/ Peanut), तिळ (Gingelly/ Sesame) तेल योग्य समजले जाते.

आयुर्वेदनुसार देशसात्म्य चा विचार करायचा म्हटले तर त्याचे फ़ायदे असे की आपल्याच प्रदेशात तेल बियाणे तयार होत असल्यामुळे, तेल सहज मिळेल आणि तेलाच जे गुणधर्म आहेत ते प्रदेशानुसार असल्यामुळे त्याचा फ़ायदा आपल्या शरीरावर उत्तम हा होणारच.

नैसर्गिक आणि पारंपरिक तयार केलेले तेल (लाकडी घाणी चे तेल)

तेल बियाण्यावर रासायनिक प्रक्रिया न करता काढलेले तेल म्हणजेच  नैसर्गिक आणि पारंपारिक  पद्धतीने काढलेले तेल. जसे- तिळ, शेंगदाणा, मोहरी/ सरसो, जवस, करडई, सुर्यफ़ुल् इत्यादी. तेल बियाणे जरासे दाबले तरी त्यातून तेल सहजतेने बाहेर येते म्हणजेच हे नैसर्गिक तेल आहे असे समजावे. हे तेल आपल्या शरीरास सर्वोत्कृष्ट समजल्या जाते. आपल्या भारतीय संस्कृती मधे तेल बियाण्यापासून तेल काढण्याची पद्धत आहे. घाणी चे तेल ज्याला आपण Cold Pressed Oil  म्हणतो, विशेषतः लाकडी घाणी चे तेल, ह्या प्रक्रियेमधे पूर्णतः पारंपरिक पध्दतीने तेल काढण्यात येते. तेल बियाण्याचे नैसर्गिक जीवनसत्व त्यात पुरेपूर राहतात. 

(राईसब्रान आणि सोयाबीन ह्या वर रासायनिक प्रक्रिया केल्यावर च तेल तयार होते म्हणजेच काय तर हे पारंपरिक तेल नाही असे म्हणावे लागेल) रिफ़ाईन तेल (Refined Oil) प्रक्रियेत उच्च तापमानावर संपूर्णता रासायनिक  प्रक्रिया केली जाते, जसे Hexane Solvent, Phosphate, Hydrated Pophatides, Caustic Soada/Soda Ash, Bleaching Agents हयाचा वापर केल्या जातो, उच्च तापमानावर (High Temp) तेल उकळल्या जाते. इतक्या साऱ्या  प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे तेलातील  नैसर्गिक सुगंध आणि जीवनसत्व (Nutritional Value) पूर्णपणे नष्ट होतो. त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होणार हे निश्चितच. सुपरमार्केट मध्ये मिळणारे, चकाकणाऱ्या तेल bottles पाहुन आणि टि.व्ही. वरील जहिरातिला भाळून आपण आपल्याच शरीरावर अत्याचार करित असतो.

लाकडी घाणीच्या तेलात शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात. ज्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ति वाढण्यास  मदत होते.

Smoke Point

Smoke/Burning Point म्हणजे काय तर? तेल विशिष्ट तापमानावर गरम होउन त्यामधुन धुर निघायला लागतो आणि तेल जळायला लागते.

भारतीय खाद्य संस्कृती आणि परदेशीय खानपान हे मुळातच खूप भिन्न आहेत. आपल्या परंपरेत तळणे, तडका देणे, भाज्यांना फ़ोडणी दिल्या जातात, तर परदेशात कच्या-भाज्या, फळे, सलाद हयाचा वापर जास्त केल्या जातो. तेलाचा वापर वरून केल्या जातो.

शेंगदाणे (Groundnut/Peanut), तिळ (Gingelly/Sesame), सरसो (Mustard) हया तेलाचा Smoke Point जास्त आहे. जो आपल्या भारतीय खानपाना करिता योग्य आहे. Olive Oil चा वापर वरून केल्या जातो. ऑलिव्ह ऑइल(Olive Oil) आपल्या देशात उगवत नाही, त्यामुळे हे देश सात्म्य च्या विपरीत (Opposite) आहे.

प्रत्येक तेलाचा Smoke Point हा वेग-वेगळा असतो. त्यामुळे स्वयंपाक करताना दोन तेल एकत्र वापरु नये. असे केल्यास ऐक तेल लवकर गरम होइल आणि दुसरे तेल उशिरा गरम होईल. तेलातील नैसर्गिक गुणधर्म जळून जातील. तेल वापरायचे झालेच तर ऋतु नुसार तेल बदलायला हवे.  तेल शक्यतो कच्चे वापरावे किंवा फार  गरम करु नये.

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) : तेल खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो का ?

 

तेल खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो हे अर्धसत्य आहे. जर खुप तळलेले पदार्थ सेवन करु लागलो किंवा ऐकाच तेला ला  वारंवार गरम करून त्याच तेलात तळून काढू लागलो तर…  कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढणार. स्वयंपाक करताना तेलाचा वापर कमी करावा, पण जेवण करताना तेल वरुन घेऊ शकतो. त्यामुळे तेल बियाण्यातील जीवनसत्व आपल्या शरीरास पुरेपूर मिळतील. तेलाची स्निग्धता शरीरामध्ये असलेला कोरडेपणा कमी करेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर-पाठ दुखी (Body Pain) असेल तर ते कमी होईल. असे बरेचसे तेलाचे फ़ायदे  शरीरास मिळतील.  

कोलेस्ट्रॉल च्या भीतीने आजकल Doctor जेवणात तेल कमी करायला किंवा बंद च करायला सांगतात. आयुर्वेदात तेलाला उत्कृष्ट वात शामक म्हटल्या गेल आहे. जर शरीरात वात-दोष वाढला असेल तर त्याला कमी करण्याकरिता  तेल सर्वोत्तम मानलं  गेल आहे. वात चिकित्सेमधे सर्वात महत्वाचे औषध् जर कोणते असेल तर ते तेल  म्हणजेच स्नेह हे आहे आणि आपण तो स्नेहच आहारातुन कमी केला तर?……. वाताचा कोरडेपणा, रुक्षपणा, वेदना कमी होण्याकरिता आहारामधे तेल म्हणजेच स्नेह हा आवश्यक आहे. 

 

स्नेह हा जेवणात आणि जीवनातही असायलाच हवा.

चला तर मग… आपल्या भारतीय पारंपारिक आणि नैसर्गिक पध्दतीने तयार केलेल्या लाकडी घाणीचे तेल वापरू या.

आपल्या परिवाराला आणि येणाऱ्या पिढीला सुदृढ  बनऊ या .


Buy our products from :
 https://stavyas.com/shop/

 

नारळचेतेल- एकअमृततुल्य आरोग्यदायी खाद्य blog : https://stavyas.com/coconut-oil/

 https://stavyas.com/coconut-oil-a-healthy-food-like-nectar/